चुकुनही करू नका ‘या’ ५ चुका ; नाहीतर बँक तुम्हाला कधीच कर्ज देणार नाही

जेव्हा बँक मध्ये कर्ज घेण्यासाठी अर्ज करता तेव्हा तुमचा सिबिल स्कोर चेक केला जातो. जर तुमचे एखादे जुने कर्ज असेल आणि त्यामधील काही कर्ज हप्ते वेळेवर फेडले नसतील किंवा एखादं कर्ज न फेडता सेटलमेंट केले असेल तर त्याचा निगेटिव प्रभाव तुमच्या सिबिल वर पडतो.

  • तुम्ही एखादं कर्ज घेतले आहे आणि त्याचे हप्ते सुरळीत परतफेड करत आहात. परंतु काही कारणास्तव काही हप्ते वेळेवर फेडता आले नाही तर त्याचा प्रभाव तुमच्या सिबिल दिसून येतो. असे जर सिबिल मध्ये दिसून आले तर कोणतीही बँक तुम्हाला कर्ज देणार नाही.
  • तुम्ही जर एखादं जास्त कर्ज घेतले असेल तरी सुद्धा याचा परिणाम तुमच्या सिबिल दिसून येतो. यावरून असे दिसून येतो या व्यक्तीवर खूप मोठे कर्ज आहे त्यामुळे अजून कर्ज दिले तर त्याची परतफेड होणे शक्य होणार नाही असे दिसून येते. त्यामुळे इतर बँक तुमचे कर्ज नाकारू शकते.
  • तुम्ही जेव्हा जेव्हा कर्ज मिळण्यासाठी वेगवेगळ्या बँक मध्ये किवा फायनान्स मध्ये विचारणा करता अश्या प्रत्येक वेळेस बँक किवा फायनान्स तुमचे सिबिल किवा क्रेडीट स्कॉर चेक करते. अश्या प्रत्येक बँक किवा फायनान्स यांची यादी तुमच्या सिबिल रिपोर्ट मध्ये दिसून येते यामुळे सुद्धा तुमचे सिबिल खराब होते.
  • जर तुम्ही इतर मार्गाने लोन घेतले असेल जसे कि क्रेडीट कार्ड ई. तर क्रेडीट कार्ड वरून जर लोन किवा कॅश वापर केला असेल तर तुम्ही एकूण क्रेडीट लिमिट पैकी ३०% च वापरले पाहिजे. जर तुमचा क्रेडीट वापर जास्त असेल तर याचाही परिणाम तुमच्या सिबिल वर दिसून येतो.
  • जर तुम्ही एकपेक्षा जास्त क्रेडीट कार्ड वापरात असाल किवा वारंवार नवीन क्रेडीट कार्ड साठी अर्ज करीत असाल तरी सुद्धा तुंच्या सिबिल याचा परिणाम काही काळासाठी दिसून येतो.

Leave a Comment