महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास या विभागामध्ये २३६ पदासाठी भरती
महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभाग : महिला व बाल विकास आयुक्तालय पुणे येथे विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. यासाठी पदाकरिता ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे. तसेच याची अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची सुरुवात १४ ऑक्टोबर २०२४ पासून सुरु झालेली आहे आणि शेवटची तारीख ०३ नोव्हेंबर २०२४ आहे. एकूण २३६ जागांसाठी ही भरती होत आहे.
या पदाकरिता आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नियुक्तीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
एकूण पदे : २३६
पदांचे नाव : संरक्षण अधिकारी गट – ब (अराजपत्रित ) , परिवीक्षा अधिकारी गट – क , लघुलेखक (उच्चश्रेणी) , लघुलेखक (निन्मश्रेणी), वरिष्ठ लिपिक / सांख्यिकी सहाय्यक , संरक्षण अधिकारी (कनिष्ठ) , वरिष्ठ काळजीवाहक गट -ड , कनिष्ठ काळजीवाहक / स्वयंपाकी गट – ड
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे (SC / ST : 05 वर्षे सवलत )
नोकरीचे ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची सुरुवात : १४ ऑक्टोबर २०२४